न्यायालयावर विश्वास नाही, सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करा – कंगना  - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 20, 2021

न्यायालयावर विश्वास नाही, सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करा – कंगना 

न्यायालयावर विश्वास नाही, सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करा – कंगना 
मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबधित सुनावणीस हजर न झाल्यास अटक वॉरंट बजावण्याच्या इशाऱ्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाली. मात्र त्याचवेळी कोणत्याही कारणाशिवाय आपल्याविरोधात अटक वॉरंट बजावण्याचा इशारा देणाऱ्या न्यायालयावर आपला विश्वास नसल्याचा आरोप कंगनाने करून प्रकरणाची सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली.

त्याचबरोबर कंगनाने अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंगनावरील आरोप हा अदखलपात्र आणि जामीनपात्र आहे. असे असतानाही न्यायालयाने कोणत्याही कारणाशिवाय सुनावणीसाठी हजर न झाल्यास अटक वॉरंट बजावण्यासाठी धमकावल्याचा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांतर्फे करण्यात आला.

प्रकरण अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याच्या कंगनाच्या अर्जावरील निर्णयानंतर या प्रकरणी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच नोव्हेंबर महिन्यात सुनावणी ठेवली.कंगनाच्या प्रकरण वर्ग करण्याच्या याचिकेवर १ ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

The post न्यायालयावर विश्वास नाही, सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करा – कंगना  appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CuwmJP
via

No comments:

Post Bottom Ad

Pages