मुंबई : क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे. यात कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चार व्यक्तींसह दोन विक्रेत्यांचा समावेश आहे.
एनसीबीने अब्दुल कादीर अब्दुल कय्युम शेख (३०), श्रेयस सुरेश नायर (२३), मनीष राजगरिया, अवीन साहू, गोपाळजी आनंद, समीर सेहगल, मानव सिंघल व भास्कर अरोरा या आठ जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. यापूर्वी आर्यन खान, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. यापैकी मोहक जैस्वाल याने अटक आरोपींना अंमलीपदार्थ दिल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जोगेश्वारी येथे कारवाई करून अडीच ग्रॅम इक्स्टसी व ५४.३ ग्रॅम मफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले होते. अब्दुल कादर शेख याच्याकडून हे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच इश्मित सिंग चढ्ढा यांच्या चौकशीतील माहितीवरून गोरेगाव येथून श्रेयस सुरेंद्र नायरला ताब्यात घेण्यात आले. शेख व नायर दोघेही अंमलीपदार्थांचे विक्रेते आहेत.
त्याच्याकडून दोन ग्रॅम चरस मिळाल्याचे समजते. याशिवाय एनसीबीने क्रुझवरील व्यक्तींची शनिवारी तपासणी केली. त्यावेळी गांजासह मनिष राजगरिया याला अटक केली. त्याला क्रुझवर पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच क्रुझवरील अविन साहुलाही अटक केली आहे.
The post ‘क्रूझपार्टी’ आयोजित करणाऱ्या कंपनीच्या चौघांसह आठ जणांना अटक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3lbobfB
via
No comments:
Post a Comment