मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे शनिवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक हिंदूी तसेच मराठी मालिकांमध्ये प्रमुख तसेच साहाय्यक भूमिका केल्या होत्या. अनेक हिंदूी, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. सध्या त्यांची ‘सिंदुर की कीमत’ ही हिंदूी मालिका ‘दंगल टीव्ही’वर सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्या ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आली होती. तत्पूर्वी ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. या मालिकेत अनुपमा या नायिकेच्या आईचे पात्र त्यांनी साकारले होते. ‘झी टीव्ही’वरील ‘राजा बेटा’, ‘सपने सुहाने लडकपन के’ तर ‘स्टार भारत’वरील कालभैरव या गाजलेल्या हिंदूी मालिकांतून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर ‘कहीं तो होगा’, ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘ऐसा कभी सोचा न था’ या त्यांच्या हिंदूी मालिका विशेष गाजल्या. ‘स्टार प्रवाह’वरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ अशा मराठी मालिकांतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. ‘डोक्याला ताप नाही’, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत ‘घनचक्कर’, ‘हे खेळ नशिबाचे’ अशा मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित कन्या आहे.
The post अभिनेत्री माधवी गोगटे यांचे करोनाने निधन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3kTICxm
via
No comments:
Post a Comment