अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन
मुंबई : ‘आपण जे काम करून त्यातून संपत्ती निर्माण झाली पाहिजे, मूल्ये निर्माण झाली पाहिजेत. आजपेक्षा उद्याची स्थिती चांगली असायला हवी. आपल्या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळून त्यांनी ते कार्य पुढे सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम शाश्वत असेल’, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीचा प्रदान सोहळा शनिवारी झाला. यावेळी काकोडकर बोलत होते.
कृषी, साहित्य या क्षेत्रांमध्ये ज्यांना अभ्यासवृत्ती मिळाली आहे त्यांच्या ज्ञानाची, नवकल्पनांची देवाणघेवाण होईल अशी व्यवस्था करण्याचा सल्ला काकोडकर यांनी दिला. तसेच ‘ग्रामीण भागात शेतीविषयक उत्पादनांशी संबंधित उद्योगांना भरपूर वाव आहे. तेथील युवकांना आपण सक्षम करू शकलो तर ग्रामीण भागात उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील आणि तेथील दरडोई उत्पन्न वाढेल’, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्यांना फारशी शैक्षणिक पाश्र्वभूमी नाही असेही अनेकजण विविध क्षेत्रांत चांगले योगदान देत असतात. त्यामुळे दरवर्षी नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही अभ्यासवृत्ती दिली जात असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
‘शरद पवार इन्स्पायर कृषी फेलोशिप’ राज्यभरातील ८० युवक, युवतींना प्रदान करण्यात आली. निवड झालेल्यांसाठी २१ दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच साहित्याच्या विविध प्रकारांसाठी एकूण १० जणांना साहित्यविषयक अभ्यासवृत्ती देण्यात आली. या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज केलेल्या परंतु ती न मिळालेल्या अशा उत्कृष्ट ३८ जणांची निवड करून त्यांच्यासाठी लेखन कार्यशाळा घेतली जाणार आहे. जानेवारीपासून शिक्षकांसाठी शिक्षणविषयक अभ्यासवृत्तीही सुरू केली जाणार आहे.
The post ‘संपत्ती आणि मूल्ये निर्माण करणाऱ्या कार्यातूनच शाश्वत विकास ’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GBqZdX
via
No comments:
Post a Comment