बीडीडी चाळीतील दुर्घटनेच्या मुद्दय़ाचा विसर
मुंबई : भाजप आमदार आशीष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वाद चिघळला असून शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. वरळी बीडीडीतील दुर्घटनेवरून हा मुद्दा पेटला तो बाजूलाच पडला असून आता या दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक आणि अपशब्दांची स्पर्धा सुरू झाली आहे.
वरळी बीडीडी चाळीतील एका घरात गेल्या आठवडय़ात मंगळवारी झालेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर स्फोटामुळे पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. या विषयावरून गेल्या आठवडय़ात झालेल्या महासभेत शिवसेना व भाजपचे नगरसेवक भिडले होते. त्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यातच आमदार आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आरोप केले होते. हे आरोप करताना शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने या मुद्दय़ावर आक्रमक होत बुधवारी रात्री मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठवडय़ात राणीच्या बागेत झालेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीतील गोंधळानंतर सभागृहाबाहेर रस्त्यावर शिवसैनिकांनी भाजपच्या नगरसेविकांना धक्काबुक्की व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे.
सभागृहाच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेविकांनी मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सभागृहाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकांनी केला आहे. तसेच या प्रकरणी महिला आयोगाकडेही भाजपच्या नगरसेविकांनी तक्रार केली होती. त्यामुळे आशीष शेलार यांच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत शेलार यांना अटक होते, तर मग भाजपच्या नगरसेविकांचा विनयभंग करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पाच दिवसांनंतरही गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल भाजपचे पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा
भाजपच्या माहीममधील नगरसेविका शीतल गंभीर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी दिल्ली येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गंभीर यांनी केली आहे.
The post महापौर-आशीष शेलार यांच्यातील वाद विकोपाला appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3dxQws6
via
No comments:
Post a Comment