दुसरी मात्रा टाळणाऱ्यांवर पालिकेचे लक्ष केंद्रित
मुंबई : लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिकेने आता रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. काही ठरावीक विभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. लशीची दुसरी मात्रा घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना हेरून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
मुंबईत सध्या पालिकेच्या केंद्रांवर सकाळी ९ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाते. तर काही ठरावीक केंद्रावर संध्याकाळी सहा किंवा रात्री नऊ वाजेपर्यंत लसीकरण होते. ही वेळ वाढवून दहा वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे. मुंबईतील बराचसा वर्ग असा आहे, ज्यांना दिवसभरात लसीकरणासाठी वेळ मिळत नाही. कामानिमित्त मुंबईत येणारा किंवा मुंबईबाहेर जाणारा वर्ग रात्री उशिरा घरी परतत असतात. त्यामुळे लसीकरणासाठी वेळ मिळत नाही, अशा वर्गाचे लसीकरण करण्यासाठी काही ठरावीक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभाग चाचपणी करीत आहे.
मुंबईत आतापर्यंत एक कोटी ७० लाख ५३ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९७ लाख ४८ हजारांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ७३ लाख चार हजारांहून अधिक नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाण वाढावे याकरिता पालिका आता लसीकरणाची वेळ वाढवण्याचा विचार करीत आहे.
The post आता रात्री १० पर्यंत लसीकरण?; दुसरी मात्रा टाळणाऱ्यांवर पालिकेचे लक्ष केंद्रित appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3rWAlgb
via
No comments:
Post a Comment