संजय राऊत यांचे गौरवोद्गार
मुंबई: यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांचा उल्लेख करतो त्या वेळी त्याचा अर्थ यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारच्या भावी महाराष्ट्राचे चित्र आपल्या मनात रंगवले होते त्या चित्रानुसार या राज्यशकटाला दिशा आणि गती देण्याचे काम गेल्या ४०-४५ वर्षांत पवारांनी केले, असे उद््गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणे’ या ग्रंथाचे प्रकाशन पार पडले. शरद पवार यांनी १९८८ ते १९९६ या काळात केलेल्या ६१ भाषणांचा संग्रह ‘नेमकचि बोलणे या ग्रंथात करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, दृक्-श्राव्य माध्यमातून अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पुस्तकाचे लेखक डॉ. सुधीर भोंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. पवार यांच्या काही निवडक भाषणांचे अभिवाचन पत्रकार अनंत बागाईतकर, कवी किशोर कदम, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमित, कलाकार संदीप मेहता आणि शंभू पाटील यांनी केले.
भाषणाचा हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊन ‘नेमकचि बोलणे’ म्हणजे काय हे फोड करून सांगू, असा टोला खासदार संजय राऊत यांनी या वेळी लगावला.
The post राज्यशकटाला दिशा आणि गती देण्याचे काम पवारांनी केले!; संजय राऊत यांचे गौरवोद्गार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yeAn4k
via
No comments:
Post a Comment