मंगळवारी ‘लोकसत्ता विश्लेषण’ वेबसंवाद
मुंबई : सध्या चर्चेत असलेले बिटकॉइनसदृश क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनाचा साराच मामला गूढमय, म्हणूनच तो अनेकांसाठी रंजकही. त्यामुळेच ‘क्रिप्टो’चे अंतरंग समजावून देऊन, नेमक्या गुंतागुंतीचा उलगडा येत्या मंगळवारी, १४ डिसेंबरला ‘लोकसत्ता विश्लेषण’ या कार्यक्रमातून गौरव सोमवंशी हे करणार आहेत.
संपूर्ण नभोविश्वाला व्यापणारे अफाट रूप असलेल्या या कूटचलनाबद्दल कुतूहल व असोशीही. त्याची अलिकडची लोकप्रियता, वाढते आकर्षण जितके, तितकेच त्याभोवती संभ्रम, आकस आणि कारस्थानाच्या भीतीचे कोंडाळेही. त्यासाठी वापरात येणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान मात्र उपकारक आणि सर्वसमावेशक म्हणून ममत्व असणारेही आहेतच.
कूटचलनाच्या मुळाशी असलेले तंत्रज्ञान- ब्लॉकचेन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत असलेले गौरव सोमवंशी हे या ‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमाचे वक्ते आहेत. दूरचित्रसंवाद माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात ते कुतूहल, असोशी त्याचप्रमाणे संभ्रम आणि भीतीही असलेले ‘क्रिप्टो’चे अंतरंग ते खुलवून सांगतील. मंगळवारी, १४ डिसेंबर, सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या वेबसंवादात सहभागी होणाऱ्या वाचकांना त्यांच्या मनातील प्रश्न तज्ज्ञ वक्त्यांना विचारता येतील.
देशात एकीकडे आभासी चलनाला गुंतवणूक मालमत्ता म्हणून मिळत असलेली वाढती लोकप्रियता आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, डी. सुब्बाराव यांनी त्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. तर सरकारच्या प्रस्तावित विधेयकात, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला चालना आणि संवर्धनाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल चलनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवण्याच्या संकेतांचा नेमका अर्थ काय, हे या निमित्ताने वाचकांना समजून घेता येईल.
कधी?
मंगळवार, १४ डिसेंबर २०२१, संध्याकाळी ६ वा.
वक्ते : गौरव सोमवंशी
सहभागी कसे व्हाल?
http://tiny.cc/LS_Vishleshan_14Dec यावर पूर्वनोंदणी आवश्यक. वरील ‘क्यूआर कोड’द्वारेही नोंदणी करता येईल.
The post ‘क्रिप्टो’च्या गूढ विश्वाचा आढावा; मंगळवारी ‘लोकसत्ता विश्लेषण’ वेबसंवाद appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/31Nhw49
via
No comments:
Post a Comment