मुंबई: पोलिसांनी रविवारी प्रसंगावधान दाखवत एका महिला पर्यटकाचा जीव वाचवला. गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला मुंबई सागरी पोलीस व कुलाबा पोलिसांच्या पथकाने आपला जीव धोक्यात टाकून वाचवले. गेट वे ऑफ इंडियाजवळ अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या शेजारच्या समुद्रातून बोटीने एलिफंटा आणि मांडव्याला प्रवास करतात. ही महिला तिच्या मित्रासोबत बोटीवरून फिरायला गेली होती. त्यावेळी समुद्राच्या लाटेच्या जोरदार धडकेमुळे ती समुद्रात पडली. महिला बुडत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे सागरी सुरक्षा दल सतर्क झाले. तात्काळ घटनास्थळी पोहोचून महिलेला दोरखंड देत तिचा जीव वाचवला. ही महिला तिच्या मित्रासोबत गेट वे ऑफ इंडिया परिसरात फिरण्यासाठी आली होती. महिलेला वाचवण्यासाठी मुंबई पोलीस कर्मचारी आणि सागरी रक्षक यांनी जीवाची बाजी लावली. त्याचे चित्रीकरणही समाज माध्यमांवर चांगलेच प्रसिद्ध झाले होते. यावेळी अनेकांनी मुंबई पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
The post समुद्रात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F6LJJn
via
No comments:
Post a Comment