रस्त्यांची दुर्दशा- अपघातांचा धोका
राज्यात अडीच वर्षांत १,६१९ प्रकरणांत गुन्हे
मुंबई : क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक करून अपघातांचा धोका निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यांच्याही नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांवर आणि मालकांवर गेल्या अडीच वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १,६१९ गुन्हे दाखल झाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. मुळात अशा वाहनांची संख्या आणि पोलीस ठाण्यांतील तक्रारींचे प्रमाण पाहता गुन्हे मात्र कमी प्रमाणात दाखल होत आहेत.
प्रत्येक वाहनातून किती माल वाहून न्यावा, याचे प्रमाण आरटीओने ठरवून दिले आहे. मालवाहू वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रावरच आरटीओ तशी नोंद करते. मात्र मालवाहतूकदार या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यामुळे अपघातांचाही धोका संभवतो. क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११३ व ११४ नुसार चालक किंवा मालकाविरोधात कारवाई होते. नियम धुडकावणाऱ्या वाहनातील जादा माल उतरविण्यात येतो आणि तडजोड शुल्क आकारून त्यांना सोडून दिले जाते. वाहनचालक तडजोड शुल्क भरण्यास तयार नसल्यास तो वाद न्यायालयात सोडविला जातो. ही कारवाई होतानाच क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करून रस्ते खराब करणाऱ्या अवजड वाहन चालक, मालकाविरोधातही तक्रार व गुन्हे दाखल करण्याचा निर्णय डिसेंबर २०१८ मध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला होता.
वाहनांमधून क्षमतेपेक्षा जादा माल वाहून नेल्याने रस्त्यांचे नुकसान होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक याचिका दाखल झाली होती. ‘प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट, १९८४ ’च्या तरतुदीनुसार अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी याचिकाकर्त्यांने केली होती. न्यायालयाने २३ ऑगस्ट, २०१७ ला अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परिवहन विभागाने तडजोडीबरोबरच गुन्हा दाखल करून कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आजपर्यंत अशी कारवाई सुरू ठेवली आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर आरटीओकडून अवजड वाहनांची तपासणी के ली जाते. एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून नियम मोडणारी ४० हजार ८९६ वाहने आढळली. यात दंड न भरणाऱ्या आणि रस्तेही खराब करणाऱ्या अवजड वाहन चालक, मालकांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकू ण २९ हजार १५४ तक्रारी दाखल झाल्या. परंतु त्यापैकी गुन्हे मात्र १ हजार ६१९ दाखल झाले. यात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत ६१० गुन्हे, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये २६४ आणि एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वाधिक ७४५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली.
११३ कोटी रुपयांची दंडवसुली
राज्यात एप्रिल २०१९ पासून ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत के लेल्या कालावधीत ४० हजार ८९६ वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. यामध्ये २३ हजार ९३० अवजड वाहने आरटीओकडून ताब्यात घेण्यात आली. दंड भरताच वाहने सोडण्यात आली. क्षमतेपक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठा दंड आकारला जातो. जास्तीत जास्त २० हजार रुपये व त्याहून अधिक दंड आकारण्यात येतो. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात सुमारे ११३ कोटी रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
The post दोषी अवजड वाहनमालकांवर कारवाईचे प्रमाण कमीच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FmQJuW
via
No comments:
Post a Comment