देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई : आरोग्य, म्हाडा, शिक्षक, पोलीस भरतीच्या परीक्षांमधील गैरव्यवहारांची केंद्रीय गुप्तचर खात्यातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्याकडे ८८ लाख रुपये सापडले. त्यानंतर आणखी दोन कोटी रुपये व सोनेही आढळून आले. म्हाडा परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीला सुपे यांनी काळ्या यादीतून तीन महिन्यांमध्ये बाहेर काढून अभय दिले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्याकडे पोलीस भरतीची ओळखपत्रे सापडली आहेत. म्हणजे आरोग्य, म्हाडा, टीईटी, पोलीस अशा सर्वच भरती परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सीबीआय चौकशी झाली तरच या गैरव्यवहारांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयला सोपवावे.
The post भरती परीक्षा गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yLG8qr
via
No comments:
Post a Comment