एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश झाल्याचं सांगत कुणीतरी त्यांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही एसटी कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू, असा इशाराही दिला. ते संप मागे घेतल्याची घोषणा करताना बोलत होते.
अजय गुजर म्हणाले, “एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश आहेत. ते लवकरच संप मागे घेतील. आम्ही त्यांना समजाऊन सांगितल्यावर ते संप मागे घेतील. या कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकावत आहे. त्यांना आम्ही व्यवस्थित समजाऊन सांगू.”
सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत का? अजय गुजर म्हणाले…
“सदावर्ते हे वकील आहे. वकिलांनी वकिलांचं काम करावं. सदावर्ते म्हणतात तसं हा दुखवटा असला तरी तो दुखवटा शांततेत करायचा असतो, नाचून भजनकीर्तन करून दुखवटा करू नये. हा दुखवटा शांततेत करायला हवा,” असं अजय गुजर यांनी सांगितलं.
यावेळी अजय गुजर यांनी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत गरज पडल्यास दुसरा वकील देऊ असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “आम्ही आमच्या विलनीकरणाच्या भूमिकेशी ठाम आहोत. गुणवंत सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर साहजिकपणे आम्हाला दुसरे वकील पाहावे लागतील. त्यानिमित्ताने आम्ही कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू.”
एकूणच गुणवंत सदावर्ते आणि अजय गुजर यांच्यात मतभेद असल्याचं दिसत आहे. सदावर्तेंनी देखील गुजर यांना टोला लगावत एसटी कर्मचारी संप करत नसून दुखवटा पाळत आहेत असं म्हटलंय.
The post “…तर आम्हाला सदावर्तेंऐवजी दुसरे वकील पाहावे लागतील”, कामगार नेते अजय गुजर यांचा अल्टीमेटम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mkWkKp
via
No comments:
Post a Comment