महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे पहिल्या दिवशी देवदर्शन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 7, 2021

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे पहिल्या दिवशी देवदर्शन

मुंबई : घटस्थापनेच्या दिवशी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडल्याचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी मंदिर- दर्ग्यावर जाऊन माथा टेकला. आघाडी सरकार हिंदूविरोधी असल्याच्या विरोधकांच्या प्रचाराला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबादेवीचे सपत्नीक दर्शन घेत अप्रत्यक्ष उत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांनी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर जयंत पाटील पुणे दौऱ्यावर गेले आणि तेथेही त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथचे दर्शन घेतले. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी माहीम दग्र्यावर प्रार्थना केली.

The post महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे पहिल्या दिवशी देवदर्शन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mykDnd
via

No comments:

Post Bottom Ad

Pages