राज्यात लवकरच नव्या केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी
मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी लवकरच महाराष्ट्रात के ली जाण्याची शक्यता आहे. वाढते अपघात आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभाग आग्रही आहे. कायद्यातील काही मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या आठवड्यात किं वा पुढील आठवड्यात चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली. सुरुवातीला देशभरातील काही राज्यांकडून विरोध झाल्यानंतर त्याची हळूहळू अंमलबजावणी होऊ लागली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध के ला. सर्वसामान्यांकडून विरोध होत असल्याचे कारण पुढे करत तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याताल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट के ले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चाही होती. त्यानंतर या नवीन कायद्याचा विचार होत नव्हता. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही आहे.
यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता, वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसविण्यासाठी नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीचा विचार के ला जात आहे. त्यातील दोन ते तीन महत्त्वाच्या मुद्यांवर मुख्यमंत्री पातळीवरच चर्चा करणे योग्य ठरेल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या आठवड्यात किं वा पुढील आठवड्यात चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.
नवा कायदा कठोर…
नवीन मोटर वाहन कायद्यात भरधाव वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंडाची आणि शिक्षेची तरतूद आहे. सध्या एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास सध्याचा एक हजार रुपये असलेला दंड पाच हजार रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.
मद्यपान करून वाहन चालविल्यास सध्या तीन हजार रुपये असलेला दंड दहा हजार रुपये, परवान नसतानाही वाहन चालविल्यास ५०० रुपये असलेला दंड पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
The post बेशिस्त वाहन चालकांवर अंकुश appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3amsiiZ
via
No comments:
Post a Comment