ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 6, 2021

ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन

मुंबई : रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेतील रावणाच्या भूमिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेली कित्येक वर्षे ते आजारी होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी कांदिवली येथील डहाणूकर वाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्रिवेदी यांनी दूरदर्शनवर ‘विक्रम और बेताल’सारख्या काही मालिकांमधूनही काम केले होते. चाळीस वर्षे ते गुजराती अभिनेते म्हणून कार्यरत होते. गुजराती चित्रपटांबरोबरच १९७२ सालच्या ‘जंगल में मंगल’ आणि त्यापाठोपाठ आलेल्या ‘आज की ताजा खबर’सारख्या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका के ल्या होत्या. तब्बल ३०० चित्रपटांमधून काम के लेले त्रिवेदी राजकारणातही काही काळ सक्रिय होते. २००२ ते २००३ या कालावधीत ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिके शन’चे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.

The post ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oExnvm
via

No comments:

Post Bottom Ad

Pages