मार्च ते मे या काळातील अवकाळीग्रस्तांसाठीही १२२ कोटींचा निधी मंजूर
मुंबई : राज्यातील चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफु टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार येत्या चार दिवसांत या मदतीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्याचप्रमाणे मार्च ते मे दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १२२ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैरी येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सातत्याने चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सरकारी मदतीची प्रतीक्षा करीत आहे. संपूर्ण पंचनामे होण्यास वेळ लागणार असून अजूनही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीतच अधिक वेळ न घालवत तूर्तास प्रचलित पद्धतीनुसार मदत द्यावी, अशी भूमिका काही मंत्र्यांनी मांडली. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे जुलैपर्यंत ४ लाख २१ हजार हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले होते.
तर आतापर्यंत ४६ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून हे क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १६ लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठ ते १० दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि नेमक्या नुकसानचा अंदाज येईल, अशी माहिती भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांतील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून हा निधीही वितरित करण्यात आला आहे. ज्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
The post राज्यातील अतिवृष्टीबाधितांना तातडीने मदत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mtWY7B
via
No comments:
Post a Comment