दसऱ्याला जाहीर मेळावा घेण्याची सेनेची तयारी - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 6, 2021

दसऱ्याला जाहीर मेळावा घेण्याची सेनेची तयारी

मुंबई : करोनाची साथ थोडी नियंत्रणात असल्याचे चित्र असल्याने पुढील वर्षीच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी नेते-शिवसैनिकांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइनऐवजी थेट घेण्याचा विचार शिवसेनेत सुरू झाला आहे.

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशीच इच्छा आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर के ले आहे. करोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर झाला नव्हता. पण आता करोना नियंत्रणात असल्याचे चित्र असून या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या, मंदिरे खुली होत आहेत, जनजीवन सुरळीत होत आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर घेण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

The post दसऱ्याला जाहीर मेळावा घेण्याची सेनेची तयारी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2WOqhcb
via

No comments:

Post Bottom Ad

Pages