खुल्या बाजारातील विजेचे दर तिप्पट - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 6, 2021

खुल्या बाजारातील विजेचे दर तिप्पट

|| सौरभ कुलश्रेष्ठ

ग्राहकांवर भार; चार रुपयांवरून दर १४ रुपयांवर

मुंबई : कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्राच्या महानिर्मिती या सरकारी वीज कं पनीसह देशभरातील वीज कं पन्यांच्या वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने खुल्या बाजारातील विजेच्या दरात महिनाभरात ४ रुपयांवरून १४ रुपयांपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढ झाली आहे. ऑक्टोबर  उष्म्यामुळे (ऑक्टोबर हिट) वीज मागणी भागवण्यासाठी खुल्या बाजारातून कराव्या लागणाऱ्या या महाग वीज खरेदीचा बोजा अखेर वीजग्राहकांवरच पडणार आहे.

केंद्र सरकारच्या कोळसा कंपन्यांकडून महाराष्ट्राच्या वीज प्रकल्पांना के वळ ४५ टक्केच कोळसापुरवठा होत असल्याने महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांवर कोळसा टंचाईचे संकट कोसळल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २२ सप्टेंबरलाच दिले होते. त्यानंतर आता देशभरातच कोळसा टंचाईची कबुली केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी दिली. त्यामुळे देशातील ऊर्जेच्या बाजारपेठेत घडामोडी वाढल्या आहेत.

महाराष्ट्राचा विचार करता महानिर्मिती या सरकारी वीजनिर्मितीच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्पांची क्षमता १० हजार १७० मेगावॉट आहे.

पण कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांमधून ४ हजार ते ४५०० मेगावॉट म्हणजेच ४० ते ४५ टक्केच वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे राज्यातील विजेची मागणी भागवण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांतून अधिकाधिक वीजनिर्मितीबरोबरच गरजेनुसार महावितरणला खुल्या बाजारातून वीज खरेदी करावी लागत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देशातील वीज बाजारातील सरासरी वीजदर ४ रुपये प्रति युनिट होते. नंतरच्या टप्प्यात ते ६ रुपयांवर पोहोचले. मात्र गेल्या चार-पाच दिवसांत खुल्या बाजारातील वीजदर कमाल १४ रुपयांपर्यंत पोहोचले. म्हणजेच जवळपास तिपटीहून अधिक वाढ वीजदरात झाली.

सप्टेंबरपर्यंत महावितरणला राज्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० मेगावॉटपर्यंत वीज खुल्या बाजारातून घ्यावी लागत होती. आता ऑक्टोबर हीटमुळे हे प्रमाण ८०० ते एक हजार मेगावॉटपर्यंत पोहोचले आहे. ही वीज खरेदी करण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट ते तिप्पट दर द्यावा लागत आहे. या महाग विजेचा बोजा पुढच्या वर्षी वीजदरवाढीतून राज्यातील वीजग्राहकांवरच पडणार आहे.

कोळसाटंचाईने कोंडी

ऑक्टोबर हीटमुळे व कोळसाटंचाईमुळे महाराष्ट्राला नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात खुल्या बाजारातून वीज घ्यावी लागत आहे. खुल्या बाजारातील वीजदर कमाल १४ रुपयांपर्यंत गेल्याने त्याचा फटका अखेर वीजग्राहकांनाच बसणार आहे. कोळसा टंचाईची कोंडी कधी सुटते व पुढच्या काही काळात किती प्रमाणात महाग वीज घ्यावी लागते व दर किती राहतात यावर लोकांवर किती बोजा पडेल हे अवलंबून राहील, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले.

The post खुल्या बाजारातील विजेचे दर तिप्पट appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3lhfhgT
via

No comments:

Post Bottom Ad

Pages