मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन ऑटोमोबाइल असोसिएशन्सचे अध्यक्ष तसेच वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा यांची फेडरेशन इंटरनॅशनल ऑटोमोबाइलच्या (एफआयए) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेमार्फत ‘फॉम्र्युला वन’चे संचलन केले जाते. हा बहुमान मिळवलेले ते पहिले भारतीय आहेत. त्यांची निवड २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी असेल. एकूण २० देशांतील सदस्यांतून त्यांना हा बहुमान मिळाला आहे. पर्यटनाशी संबंधित असलेली जागतिक संघटना एआयटीचे ते अध्यक्ष होते. अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ अशा दीर्घकालीन धोरणांचे नियोजन केले. तसेच त्यांच्या अनुभवाचा वापर करून विविध संलग्न संस्थांमध्ये रस्ते सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती केली. त्यांच्याच नेतृत्वात वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनला रस्ते सुरक्षेबाबत दिलेल्या योगदानाबद्दल राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळाले होते.
The post नितीन डोसा यांची निवड appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Djfu9u
via
No comments:
Post a Comment