तपास यंत्रणांना चकवण्यासाठी नशेची नवनवीन साधने - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 11, 2021

तपास यंत्रणांना चकवण्यासाठी नशेची नवनवीन साधने

|| अनिश पाटील

केकखेरीज मशरूमचा वापर

मुंबई : अमलीपदार्थविरोधी पथकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी विक्रेते नवनवीन शक्कल लढवत आहेत. नुकतीच केंद्रीय अमलीपदार्थविरोधी पथकाने हशीशचा केक बनवणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञाला अटक केली होती. केकमधून कोणी अमलीपदार्थांचे सेवन करत आहे, यावर कोणाला संशयही येणार नाही म्हणून ही पद्धत अवलंबिण्यात आली होती.  केकप्रमाणे मशरूम, रासायनिक गांजा (स्पाईस), फ्लॅका यासारखे नवनवीन अमलीपदार्थही विकले जात आहेत.    त्यामुळे तपास यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या आहेत.

 एनसीबीने महिन्याभरापूर्वी माझगाव येथे छापा टाकून केकच्या स्वरूपात असलेले सुमारे १० किलो हशीश जप्त केले होते. तो हशीश व ओपीएम मिसळून ब्राऊनी केक बनवत होता. आरोपी हश ब्राऊनी नावाने हा केक उच्चभ्रू पाट्र्या व ग्राहकांमध्ये विकत होता.  रेनबो केक (चरस, गांजा आणि हशीश), हॅश ब्राऊनी (हशीश), पोर्ट ब्राऊनी (गांजा) असे विविध प्रकारचे नशा आणणारे केक आरोपी विकत होता. याशिवाय ‘स्पाईस’ नावाचा रासायनिक गांजाही चांगला प्रचलित आहे. कृत्रिम गांजा असलेले हे ड्रग्स वैद्यकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे मोठ्या संख्येने तरुण त्याच्या आहारी गेले आहेत. पोलिसांकडे सध्या याबाबत एकही गुन्हा दाखल नसला, तरी या ड्रग्सचे सेवन करणारे तरुण, तरुणी वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांकडे येत आहेत.

 तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी रासायनिक ड्रग्जसह परदेशातील पारंपरिक ड्रग्ज भारतात आणले. त्यात मॅजिक मशरूमचाही समावेश आहे. दक्षिण अमेरिका, मेक्सिको व इंडोनेशियात प्रचलित असलेल्या या प्रतिबंधित मशरूमसह नुकत्याच कोलकात्याहून एनसीबीने एका डिस्क जॉकीला (डीजे) अटक केली होती. त्याच्याकडून २.४९  ग्रॅम मॅजिक मशरूम, २० एलएसडी ब्लॉट्स, नऊ गोळ्या (एमडीएमच्या) व १३.५ ग्रॅम इक्स्टसी सारखा पदार्थ हस्तगत करण्यात आला होता. भाजीच्या मशरूमपेक्षा याची चव थोडी कडू लागते. एवढाचा फरक आहे. त्यामुळे इतर खाद्यपदार्थ अथवा चॉकलेट सिरप त्यावर टाकून त्याचे सेवन केले जाते. त्याची नशा अगदी आठ तास राहते. रासायनिक ड्रग्स, एमडी व एलएसडीपेक्षाही ती जास्त काळ आहे. चौकशीत आरोपी बिटकॉइनच्या माध्यमातून डार्कनेटवरून हे अमलीपदार्थ मागवत असल्याचे उघड झाले. त्यांची विक्री पुढे डीजे वाजवण्यासाठी जात असलेल्या पाट्र्यांमध्ये ग्राहकांना हेरून केली जायची.

 मशरूमच्या दोन हजार जातीपैकी १४४ जातींमध्ये नशा देणारा घटक असतो. त्यामुळे अमेरिका खंडानंतर गेल्या काही वर्षात पूर्व आशियात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा यासारख्या देशांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत मॅजिक मशरूमवर बंदी आणली आहे. भारतात या मशरूमवर बंदी नाही, पण त्यातील नशेच्या घटकांवर बंदी आहे. भारतात सध्या अमलीपदार्थांबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामुळे विक्रेतेही नवनवीन मार्ग वापरून अमलीपदार्थांची विक्री करीत आहेत.

‘स्पाइस’, ‘फ्लॅक्का’चा धोका

स्पाईस हा गांजासारखाच असून त्याच्यामुळे अधिक नशा येते. गांजावर विशिष्ट रसायनिक प्रक्रिया करून हा अमलीपदार्थ बनवला जातो. पण त्याचे दुष्परिणाम फार भयानक आहेत. त्याचे अतिसेवन झाल्यास माणून एखाद्या झोंबीप्रमाणे म्हणजे निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो. त्यामुळे हे ड्रग्स ‘झोंबी’ म्हणून प्रसिद्ध असून त्यामुळे सेवन करणाऱ्या व्यक्तीला वेडही लागू शकते. ‘फ्लॅक्का’ नावाचा अमलीपदार्थही ‘झोंबी ड्रग्ज’ म्हणून प्रचलित आहे. ‘फ्लॅक्का’ याचे रासायनिक नाव अल्फा पीव्हीपी आहे. पावडर अथवा गोळ्यांच्या स्वरूपात हे ड्रग्ज असते. त्याचे सेवन धूम्रपानाद्वारे अथवा इंजेक्शनद्वारे केले जाते. काही देशांमध्ये त्याच्यावर फेसबुकसारखे चिन्ह असल्यामुळे ते सांकेतिक भाषेत फेसबुक म्हणूनही प्रचलित झाले होते. हा अमलीपदार्थ इतका भयानक आहे की, याच्या सेवनानंतर अनेक तरुणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. पण हे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यात प्रचंड शक्ती प्राप्त झाली, असा भास होतो. त्याच्या हालचालीही तशाच असतात. हे ड्रग्स डार्कनेटच्या माध्यमातून देशातही सहज उपलब्ध होऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

The post तपास यंत्रणांना चकवण्यासाठी नशेची नवनवीन साधने appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YI1TtD
via

No comments:

Post Bottom Ad

Pages