वक्फ जमीन गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 13, 2021

वक्फ जमीन गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा

 मुंबई :   राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थेकडील इनामी जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी परतूर (जि. जालना) येथे नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार  असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी दिली.

परतूर येथील दोन मशिदी या वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. मात्र नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी  यांनी संगनमत करून या इनामी जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री करुन गैरव्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर नऊ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

The post वक्फ जमीन गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nbgJ59
via

No comments:

Post Bottom Ad

Pages