मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी व बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने दोन दिवसांनी वाढवली. गोरेगाव खंडणी प्रकरणात शनिवारी वाझे यांची कोठडी संपत असल्यामुळे गुन्हे शाखेने त्यांना सुटीच्या न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी केली होती.
तक्रारदाराकडून घेतलेले खंडणीचे पैसे कोठे गेले, याबाबत माहिती घेण्यासाठी वाझे यांची चौकशी करायची असल्यामुळे गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने वाझेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
The post सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3caKKMc
via
No comments:
Post a Comment