मुंबई: महिलेने व्हॉट्सअॅपवर अश्लील अवस्थेत दूरध्वनी करून त्याचे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी ७७ वर्षांच्या सेवानिवृत्त प्राचार्यानी खार पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार प्राचार्याना ८ नोव्हेंबरला मानसी पाटील असे नाव सांगणाऱ्या महिलेने फेसबुक मेसेजरवर संदेश पाठवला होता. त्यावेळी तिने प्रत्यक्षात बोलायचे असल्याचे सांगून दूरध्वनी क्रमांकाची मागणी केली, मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने स्वत:चा मोबाईल क्रमांक पाठवून त्यांच्याकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने मोबाईल क्रमांक दिला असता त्या महिलेने पुढे दोन ते तीन दिवस व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवले. पण तक्रारदारांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर तिने १२ नोव्हेंबरला तक्रारदार यांना व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी ही महिला अश्लील अवस्थेत होती. तक्रारदारांनी दूरध्वनी बंद केला. त्यानंतर महिलेने २४९ रुपये मोबाईल रिचार्ज करण्यास सांगितले. त्यावेळी तक्रादार यांनी त्यांच्या मैत्रीणीच्या माध्यमांतून या महिलेच्या मोबाईलवर रिचार्ज केले. १५ नोव्हेंबरला पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल आला. तिने तक्रारदारांना याची चित्रफीत त्यांचे सर्व कुटुंबीय, पत्नी, मुलांना व फेसबुकवरील सर्व मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर या निवृत्त प्राचार्यानी खार पोलिसांत तक्रार केली.
The post सेवानिवृत्त प्राचार्याकडे खंडणीची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3DEv0gx
via
No comments:
Post a Comment