पहिली ते सातवीची शाळा सुरू - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

पहिली ते सातवीची शाळा सुरू

३४ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र सादर; उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण

मुंबई : करोनाविषयक नियमांचे पालन करून मुंबईमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि पालिका शाळांतील इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे ३४ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनीच संमतीपत्र देऊन पाल्याला शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे लागणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांची संख्या २,२४६ असून त्यापैकी १,९०२ शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. या शाळा इमारतींचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

मुंबईतील अनुदानित, विनाअनुदानित आणि पालिकेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये सुमारे सहा लाख ५३ हजार २३९ विद्यार्थी असून त्यापैकी ३४ टक्के म्हणजेच दोन लाख ३५ हजार ११९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्याची तयारी दर्शवत शाळा प्रशासनाला संमतीपत्र सादर केले आहे. परिणामी, आयुक्तांच्या आदेशानुसार ६६ टक्के म्हणजेच चार लाख १८ हजार १२० विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शाळांना बंधनकारक आहे.

२० हजारांहून अधिक शिक्षकांचे लसीकरण

अनुदानित, विनाअनुदानित आणि पालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून २४ हजार ९७२ कर्मचारी वृंद आहे. यापैकी २४ हजार ३०६ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज उपस्थित होते.

मनपा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पहिली ते सातवीच्या एकूण शाळांची संख्या :- २४३४

(सर्व माध्यमाच्या मनपा प्राथमिक, मनपा सीबीएसई व आयसीएसई, मनपाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा)

सुरू झालेल्या शाळांची संख्या :- २२४६  (९२.२८%)

पहिली ते सातवीतील एकूण विद्यार्थी संख्या :- ६,५३,२३९

संमतिपत्रप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या :- २,३५,११९ (३६%)

आज उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :- १,८०,६४० (७७%)

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या :- २४,९७२

आज उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या :- २४,३०६ (९७%)

पालिका शाळांमध्ये मुखपट्टीचा पुरवठा

करोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असला तरीही ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करण्याचे आदेश शाळा प्रशासनांना देण्यात आले आहेत.

 तसेच सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मुखपट्टी, थर्मल गन, प्लस ऑक्सिमीटर, इमारत र्निजतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड इत्यादीचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

The post पहिली ते सातवीची शाळा सुरू appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3DWYZQo
via

No comments:

Post Bottom Ad

Pages