पुणे ते नाशिक वेगवान रेल्वे प्रवास; भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

पुणे ते नाशिक वेगवान रेल्वे प्रवास; भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू

भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू

मुंबई : पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पातील १०२ गावांपैकी आतापर्यंत ८३ गावांतील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एमआरआयडीसीएल)मधील सूत्रांनी दिली. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या काही गावांतील जमिनीच्या मूल्यांकनासाठीचा प्रस्ताव पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरूहोणार आहे.

सध्या पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नाही. पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते, परिणामी रेल्वे प्रवास सहा तासांपेक्षा जास्त होतो. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे संकल्पना अमलात आणली जात आहे. या मार्गासाठी १०२ गावांतील १ हजार ४७० हेक्टर जमीन लागणार आहे. आतापर्यंत ८३ गावांतील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

यातील ३० गावांचा कायदेशीर तपासणी अहवालही प्राप्त झाला आहे. सर्वेक्षणाच्या कामाला गती दिली जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही वेग देण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशनकडून केला जातो आहे. त्यामुळे मोजक्या गावांचा प्रस्ताव मूल्यांकनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. मूल्यांकन अंतिम झाले आणि संमतीपत्रावर सह्या झाल्या की विक्री करार प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

तीन जिल्ह्यांतून हायस्पीड रेल्वे धावणार

प्रकल्पानुसार सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग २३५.१५ किलोमीटरचा असून दोन मार्ग बनवण्यात येतील. ब्रॉड गेज बनवण्यात येणाऱ्या या मार्गावरून प्रति तास २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. याचा वेग जास्तीत जास्त प्रतितास २५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. पुण्यातून धावतानाच अहमदनगर, नाशिक अशा तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे धावेल. या प्रकल्पाची किंमत १६ हजार ३९ कोटी रुपये आहे.

मार्ग असा

जलद गती रेल्वे पुणे रेल्वे स्थानकातून सुटताच ती हडपसरपर्यंत उन्नत मार्गावरून धावेल. त्यानंतर हडपसर ते नाशिक रेल्वे स्थानकापर्यंत जमिनीवरून धावणार आहे. या रेल्वेला चाकण, मंचर, नारायण गाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथेही थांबा असेल. हायस्पीड रेल्वे सहा डब्यांची असेल. या डब्यांची संख्या १२ आणि १६ डब्यांपर्यंत वाढवू शकतो.

The post पुणे ते नाशिक वेगवान रेल्वे प्रवास; भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3E5V3N4
via

No comments:

Post Bottom Ad

Pages