विधानसभा अध्यक्षांची निवड खुल्या पद्धतीने - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 22, 2021

विधानसभा अध्यक्षांची निवड खुल्या पद्धतीने

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याबाबतचा नियम समितीचा अहवाल विधानसभेत बुधवारी सादर करण्यात आला.  नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची भूमिका सरकारने जाहीर केली आहे. गुप्त मतदानाने अध्यक्ष निवडीची पद्धत आता बदलण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालील नियम समितीने याबाबतच्या नियमात बदल करून अध्यक्षांची निवड आता आवाजी मताने किंवा हात वर करून होईल अशी सुधारणा केली आहे. भाजपाने मात्र या प्रस्तावास विरोध करताना  सरकार अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्यास का घाबरते, असा सवाल करीत या सुधारणेस विरोध केला.

The post विधानसभा अध्यक्षांची निवड खुल्या पद्धतीने appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/32vvfg8
via

No comments:

Post Bottom Ad

Pages