विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 31, 2021

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत १ कोटी ५७ लाख ८२ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

आर्थिकदृष्टय़ा गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत महाविद्यालयांतील १७६ आणि शैक्षणिक विभागातील २५ विद्यार्थ्यांसाठी ३ लाख १७ हजार ५८०रु. महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८ लाख ८१ हजार ५०० रु. तर विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांत शिकत असणाऱ्या एससी, एसटी, डीटी, एनटी गटातील विद्यार्थ्यांना २४ लाख ३२ हजार रु., पुस्तक पेढी योजनेअंतर्गत २४ हजार ६०४ आणि शैक्षणिक विभागातील ८९ विद्यार्थ्यांसाठी ७१ लाख ५१ हजार रुपये वितरित  केले गेले. विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात विद्यापीठ कायम प्रयत्नशील राहील ’, असे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

The post विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/32wFXUp
via

No comments:

Post Bottom Ad

Pages