पाच जम्बो करोना केंद्रे लवकरच सुरू - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

पाच जम्बो करोना केंद्रे लवकरच सुरू

प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

मुंबई : करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पाच जम्बो करोना केंद्रांतील आरोग्य सेवा खासगी संस्थेवर सोपविण्याच्या मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला स्थायी समितीच्या मागील बैठकांमध्ये विरोध करण्यात आला होता. मात्र  रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे  या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी चर्चेविनाच मंजुरी दिली. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग आणि सोमय्या मैदान या पाच ठिकाणची जम्बो करोना केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ज केंद्रांतील आरोग्य सेवा खासगी संस्थेवर सोपविण्याचा पालिकेचा मानस आहे. या पाच केंद्रांमधील ७४८ जीवन सुरक्षा प्रणाली असलेल्या खाटा, प्राणवायूची सुविधा असलेल्या २,०९९ खाटा, सर्वसाधारण ८०१ खाटा, लहान मुलांसाठी जीवन प्रणालीची सुविधा असलेल्या १०० खाटा, डायलिसिससह जीवन सुरक्षा प्रणाली सुविधा असलेल्या २० खाटा, लहान मुलांसाठी सर्वसाधारण १०० खाटा आदी उपलब्ध करून देण्यात येतील.   

पालिकेला प्रति आयसीयू खाटेसाठी प्रति दिन सहा हजार रुपये, प्राणवायू सुविधेच्या खाटेसाठी १,५०० रुपये, तर सर्वसाधारण खाटेसाठी ८०० रुपये मोजावे लागतील. तसेच कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर प्रचलन व व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार असून त्यासाठी वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.  यापूर्वी प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. मात्र त्यावेळी करोना  रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्यान वैद्यकीय संस्थांच्या नियुक्तीला स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी कडाडून विरोध करत त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे  याबाबतचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाच जम्बो करोना केंद्रे कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेविनाच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी   मंजुरी दिली.  

The post पाच जम्बो करोना केंद्रे लवकरच सुरू appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3exbXd5
via

No comments:

Post Bottom Ad

Pages