मनोरंजन क्षेत्रात ‘डिजिटलाइज्ड’ प्रकल्पांची नांदी - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 31, 2021

मनोरंजन क्षेत्रात ‘डिजिटलाइज्ड’ प्रकल्पांची नांदी

डिजिटल मालमत्ता स्वरूपात निर्मितीकडे पहिले पाऊल

मुंबई : करोनाकाळात ओटीटीच्या रूपात हक्काचे डिजिटल व्यासपीठ गवसलेल्या मनोरंजन क्षेत्रात नवीन वर्षांत डिजिटलीकरणाच्या दृष्टीने आणखी बदल अपेक्षित आहेत. नव्या वर्षांत डिजिटल मालमत्ता स्वरूपात मालिका निर्मितीपासून ते ओटीटीवरील कंटेंटनिर्मिती आणि प्रेक्षकसंख्या वाढवण्यापर्यंत नव्या रूपात वाढ होताना दिसणार आहे. मनोरंजन क्षेत्रात एकूणच डिजिटल व्यासपीठावरील मनोरंजनाचा टक्का वाढणार आहे. त्याची नांदीच जणू नव्या वर्षांसाठी केलेल्या घोषणांमधून झाली आहे. अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर व निर्माते रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंन्टरटेन्मेटने ‘नेटफ्लिक्स इंडिया’शी करार केला आहे. या करारांतर्गत ‘डब्बा कार्टेल’ आणि ‘क्वीन ऑफ द हिल’ या दोन चित्रपटांची निर्मिती २०२२ मध्ये सुरू होणार आहे.

सध्या कूटचलन आणि नॉन फंजिबल टोकनचे(एनएफटी) वेड बॉलीवूड क्षेत्रातही पाहायला मिळते आहे. गायक सोनू निगमने या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत ‘जेटसिन्थेसिस’ कंपनीबरोबर करार केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील पहिली नॉन फंजिबल टोकन म्हणजेच डिजिटल मालमत्ता स्वरूपातील मालिकेची निर्मिती या करारांतर्गत केली जाणार आहे. प्रादेशिक आशयनिर्मिती ही चित्रपट आणि ओटीटी दोन्हीकडेही महत्त्वाचा विषय ठरला आहे. ‘रिलायन्स एन्टरटेन्मेंट’ आणि ‘टी-सिरिज’ यांनी भागीदारीत १० प्रकल्पांची घोषणा केली आहे. हिंदूी तसेच तमिळ चित्रपट निर्मितीच्या या प्रकल्पांसाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०२२ मध्ये ‘झोंबिवली’, ‘पावनिखड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’, ‘मानापमान’, ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असे नवीन मराठी चित्रपट तसेच ‘लाल सिंग चढ्ढा’, ‘पृथ्वीराज’, ‘गंगुबाई काठियावाडी’ हे प्रमुख हिंदूी चित्रपट प्रदर्शित होतील.

येत्या आठ वर्षांत ७० अब्ज डॉलरची उलाढाल

‘द कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ (सीआयआय) यांनी ‘बोस्टनन कन्सिल्टग ग्रुप’ या संस्थेसह माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रावर नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार करोनानंतर मनोरंजन क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असून २०३० पर्यंत या उद्योगाची उलाढाल ५५ ते ७० अब्ज डॉलर्सपर्यंत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी या क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.

२०२२ मध्ये मोठे चित्रपट तिकीटबारीवर मोठी कमाई करतील अशी अपेक्षा आहे. तरीही करोनामुळे सिनेमागृह बंद पडणे तसेच प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी यामुळे या क्षेत्राच्या वाढत्या गतीवर परिणाम होऊ शकतो. प्रादेशिक सिनेमाचाही या वर्षी निश्चितच वेगाने विस्तार होईल.

सिद्धार्थ रॉय कपूर, निर्माता

The post मनोरंजन क्षेत्रात ‘डिजिटलाइज्ड’ प्रकल्पांची नांदी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/31dmk2M
via

No comments:

Post Bottom Ad

Pages