मुंबई : देशातील मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेन केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, आरक्षण नको ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. केंद्रातील भाजप सरकार तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहे.
भाजपला व संघाला देशातून आरक्षण संपवायचे आहे. मात्र फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा स्वीकारलेले पक्ष व सरकार त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
The post ‘आरक्षण संपवण्याचा भाजप सरकारचा डाव ’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yBvd2C
via
No comments:
Post a Comment