नववर्षांच्या जल्लोषावर निर्बंधांचे विरजण - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

नववर्षांच्या जल्लोषावर निर्बंधांचे विरजण

पार्टी, समारंभ, कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी; बंदिस्त सभागृहांतील सोहळ्यांनाही मनाई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नववर्षांच्या स्वागताच्या उत्साहावर निर्बंधांचे विरजण पडले आहे.

रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांनी नववर्षांच्या जल्लेषासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मनसुबे रचले होते. मात्र, काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पालिकेने नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने मुंबईत सोहळे, पार्टी, स्नेहसंमेलन, कार्यक्रम अथवा विविध उपक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. बंदीस्त अथवा मोकळय़ा किंवा खुल्या जागेत, मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. नववर्षांच्या स्वागतानिमित्त मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये यावर पोलीस दल आणि पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी समूहाने एकत्र वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.

दोन लस मात्रा घेणाऱ्यांनाच सार्वजनिक ठिकाणी योग्य ती मुभा देण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक, आयोजक, आस्थापनांनी करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पालिकेने पूर्ण तयारी केली असून खासगी रुग्णालये सुसज्ज झाली आहेत. मालाड येथील करोना उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे  उभारलेले करोना उपचार केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

 ५० टक्के उपस्थिती

मुंबईमधील सर्व उपहारगृहे, व्यायामशाळा, स्पा, चित्रपटगृहे, नाटय़गृहे येथील मंजूर क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. या सर्व आस्थापनांनी जागांची मंजूर पूर्ण क्षमता व ५० टक्के क्षमता या दोन्ही बाबी जाहीर कराव्या असे निर्देश देण्यात आले आहेत. क्रीडा स्पर्धा, समारंभांच्या आयोजनाप्रसंगी प्रेक्षकांची संख्या आसन क्षमतेच्या २५ टक्के असावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध

करोना आणि ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा विवाह सोहळे, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळा, सामाजिक, राजकीय वा धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत १००, खुल्या जागेत २५० किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के (यापैकी कमी) व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. वरील दोन्ही बाबींमध्ये समाविष्ट नसलेल्या अन्य कोणत्याही आयोजनप्रसंगी बंदिस्त व कायमस्वरुपी आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के, तर कायमस्वरुपी आसन व्यवस्था नसलेल्या बंदिस्त ठिकाणी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी 

विमानतळावर रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. करोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास त्या रुग्णास विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीसाठी (जिनोम सिक्वेसिंग) पाठवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये करोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे करोना काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत. 

‘दुबई’तून येणाऱ्यांना गृहविलगीकरण सक्तीचे

दुबईमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृहविलगीकरणात ठेवण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. आता संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

लक्षणेविरहीत प्रवाशांसाठी निशुल्क विलगीकरण

हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी बाधित असलेल्या, मात्र लक्षणे आणि औषधोपचाराची गरज नसलेल्या रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावमधील नेस्को या करोना उपचार केंद्रांमध्ये ५०० खाटांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी. अशा रुग्णांना तेथे नि:शुल्क राहता येईल. 

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची तात्पुरती भरती 

सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्षामध्ये येत्या दोन महिन्यांसाठी अतिरिक्त प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. या डॉक्टरांच्या माध्यमातून गृह विलगीकरणातील रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा आणि इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

The post नववर्षांच्या जल्लोषावर निर्बंधांचे विरजण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/33UYEkH
via

No comments:

Post Bottom Ad

Pages