मुंबई : राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. राज्यात दिवसभरात करोनाच्या ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ९ मृत्यू झाले. राज्यात दिवसभरात ७६७ करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,०६८ आहे.
मुंबईत ३३६ नवे रुग्ण
मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून सतत कमी होत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून रविवारी ३३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. साधारण दीड महिन्यानंतर प्रथमच तीनशेच्या पुढे दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे, तर दिवसभरात २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
रविवारी दिवसभरात २०१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३०० च्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद होत होती. त्यानंतर ही संख्या कमी कमी होत होती. महिनाभर दररोज केवळ दोनशेच्या आत नवीन रुग्ण आढळून येत होते. एकूण बाधितांची संख्या ७ लाख ६७ हजारांपुढे गेली आहे.
The post राज्यात करोनाचे ९०२ नवे रुग्ण appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3J382mv
via
No comments:
Post a Comment