मुंबई : मुंबई विमानतळावरील तपासणीत रविवारी ओमायक्रॉनचे सहा नवे रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. सहा रुग्णांपैकी प्रत्येकी एक रुग्ण मुंबई आणि औरंगाबाद येथील असून दोन कर्नाटकचे रहिवासी आहेत. दोघे ब्रिटनमधून आणि दोघे टांझानियातून आले आहेत. या सर्वांचे लसीकरण पूर्ण झाले असून ते लक्षणेविरहीत आहेत. उर्वरित दोघांपैकी एक पुणे आणि दुसरा पिंपरी-चिंचवडचा आहे. राज्यातील ओमायक्रॉनचे २८ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. राज्यात दिवसभरात करोनाच्या ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि नऊ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ब्रिटनमध्ये एकाच दिवशी ओमायक्रॉनचे १० हजार रुग्ण आढळल्याने नवी साथ सुरू झाल्याचे मानले जाते. गेल्या जानेवारीनंतर एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने तेथे रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. तेथील ओमायक्रॉन मृतांचा आकडाही सातवर पोहोचला आहे.
The post राज्यात ओमायक्रॉनचे सहा नवे रुग्ण appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EaNGnJ
via
No comments:
Post a Comment