मुंबई: मशीद बंदर येथील एका कपडय़ांच्या दुकानाच्या भिंतीला दीड फूट भगदाड पाडून दुकानातील सुमारे पाच लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली.
पायधुनी येथील सॅम्युअल स्ट्रीट येथे अली हुसेन अन्सारी यांचे कपडय़ांचे दुकान आणि गोदाम आहे. शनिवारी सकाळी अन्सारी तेथे गेले असता गल्ल्यातील सुमारे पाच लाखांची रोख रक्कम चोरटय़ांनी लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाच्या िभतीला भगदाड पाडून आरोपी दुकानात शिरल्याचे त्यांना आढळले. त्यांनी याप्रकरणी मशीद बंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली असता सुलेमान बशीर (सावेद) शेख (६१) या वाडीबंदर येथे राहणाऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक नवी मुंबईत पाठवण्यात आले. शेख तेथील हॉटेलमध्ये जेवायला जात असल्याचे साध्या वेशात पाळत ठेवून असलेल्या पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी शेखला तेथून अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली.
चौकशीत शेखने त्याचा साथीदार मसूद आलम याच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरीची रोख रक्कम आलमकडे असून त्यात पाचशेच्या ७०० नोटा, दोनशेच्या ३०० नोटा व शंभरच्या ४०० नोटा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलीस दुसरा आरोपी आलम याचा शोध घेत आहेत.
The post भिंतीला भगदाड पाडून दुकानात चोरी ; आरोपीला २४ तासांत नवी मुंबईतून अटक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JV2WJj
via
No comments:
Post a Comment