मुंबई: इंटरनेटवर वेगवेगळय़ा क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांची छायाचित्रे वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी संबंधित उपयोजनाचा निर्माता व ट्विटर हॅन्डल चालवणाऱ्या व्यक्तीविरोधात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
सहा महिन्यांपूर्वी सुल्ली बाई नावाने चालवल्या जाणाऱ्या गटाकडून ट्विटरवर नव्या नावाने गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांची छायाचित्रे अपलोड करण्यात येत असून त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. त्या छायाचित्रांचा लिलाव केला जात आहे. याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार चतुर्वेदी यांनी शनिवारी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला होता. चतुर्वेदी यांच्या संपर्कात मुंबईतील तीन ते चार पीडित महिला असल्याचे त्यांनी सांगितले होते. चतुर्वेदी यांनी सहा महिन्यांपूर्वी याप्रकरणी सर्वप्रथम आवाज उठवला होता. केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊनही याप्रकरणी तक्रार केली होती, असे त्यांनी सांगितले. पण आता त्याच गटाकडून नवीन स्वरूपात हा प्रकार सुरू झाला आहे.
The post मुस्लीम महिलांच्या बदनामीप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pVaXGx
via
No comments:
Post a Comment