“त्यांच्या जाण्यानं मायेची सावली हरपली”; सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यंत्र्यांची भावूक श्रद्धांजली - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 4, 2022

“त्यांच्या जाण्यानं मायेची सावली हरपली”; सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यंत्र्यांची भावूक श्रद्धांजली

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही, अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

“महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर”

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढली. ते म्हणाले, “महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका, तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही.”

“साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे उदाहरण”

“पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“सिंधुताईंच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल तीव्र  दुःख व्यक्त केले आहे. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला-मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले.

हेही वाचा : Video: ‘चिंधी’ ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय… असा होता सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

The post “त्यांच्या जाण्यानं मायेची सावली हरपली”; सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यंत्र्यांची भावूक श्रद्धांजली appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zqlJrg
via

No comments:

Post Bottom Ad

Pages