मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी
मुंबई : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईमध्ये पुन्हा ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली असल्याने शिक्षकांनाही घरूनच शिकवण्याची मुभा द्यावी अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.
सध्या वर्ग ऑनलाइन पद्धतीने भरवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ‘सध्यस्थिती लक्षात घेता प्रवासादरम्यानही करोनासंसर्ग होऊ शकतो. मुंबईतील शाळा महाविद्यालयात शिकवणारे बहुतेक शिक्षक हे दूर उपनगरात राहणारे आहेत. शिवाय विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती का,’ असा प्रश्न संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी केला आहे. शिवाय काही शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापनासाठी पुरेशी साधनसुविधा नाही. त्याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन सर्व साधने उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून ऑनलाइन शिक्षण देणे सहज होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
The post शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये बोलावू नका!; मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3t32XVT
via
No comments:
Post a Comment