मुंबई : गेल्या चार महिन्यात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत सीएनजी आणि स्वयंपाकासाठीच्या पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात महानगर कंपनीने पुन्हा वाढ केली आहे.
८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईत ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपये तर घरगुती गॅसच्या (पीएनजी) दरात प्रतियुनिट १.५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सीएनजी प्रतिकिलो ६६ रुपये तर घरगुती गॅस ३९.५० रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याआधी सीएनजीचा दर प्रतिकिलो ६३. ५० रुपये तर पीएनजीचा दर ३८ रुपये होता. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने अधिक दरात गॅस आयात केला आहे. त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याआधी डिसेंबरमध्ये सीएनजीच्या दरात २ रुपये तर पीएनजीच्या दरात १.५० रुपयांनी वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये सीएनजी ३. ९६ रुपयांनी तर पीएनजी २.५७ रुपयांनी महागला होता. ऑक्टोबरमध्येही दरवाढ झाली होती.
The post मुंबईत ‘सीएनजी’, ‘पीएनजी’च्या दरात पुन्हा वाढ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3n8mwrW
via
No comments:
Post a Comment