पोयसर नदीसाठी १२०० कोटींचा खर्च - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 10, 2022

पोयसर नदीसाठी १२०० कोटींचा खर्च

पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प वादात अडकण्याची चिन्हे

मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर आणि वालभट या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणाची कामे हाती घेतल्यानंतर आता पालिका प्रशासनाने पोयसर नदीच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. नदीच्या काठावर मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात येणार असून ११.१५ किलोमीटर लांबीच्या नदीसाठी तब्बल १,१९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नदीच्या पुनरुज्जीवीकरणासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर खर्च करण्यात येणार असल्यामुळे त्याला राजकीय विरोध होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणाबाबत पालिकेकडे वारंवार विचारणा करण्यात येते. याप्रकरणी पालिकेला दंडही ठोठावण्यात येतो. दिवसेंदिवस नदीला बकाल रूप येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी पालिकेने मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत दहिसर व वालभट दोन नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणाबाबतचे प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. आता पोयसर नदीच्या पुनरुज्जीवीकरणासाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या तीन नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.  सल्लागारांनी दिलेल्या आराखडय़ानुसार या कामासाठी जुलै २०१९ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. तब्बल १३ वेळेस मुदतवाढ  दिल्यानंतर आता कंत्राटदार निश्चित करण्यात येत आहेत. हे काम पावसाळा वगळून ३६ महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहे. खर्चावरून टीका होण्याची शक्यता  दहिसर नदीसाठी ३७६ कोटी रुपये, तर वालभट नदीसाठी ९२८ कोटी रुपये असे एकूण १,३०४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर पोयसर नदीसाठी १,१९२ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसेच सर्व करांसह हा खर्च १,४८२ कोटींवर जाणार आहे.

अपेक्षित कामे

  • नदीच्या काठावर असलेल्या वसाहती, वस्त्यांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी  नदीलगतच्या पोहोच रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून नेणे
  • नदीलगतच्या झोपडपट्टय़ांमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे व ते शक्य नसल्याने झोपडपट्टीमधून नदीमध्ये येणाऱ्या सांडपाण्यास अवरोध करून ते पाणी मलप्रक्रिया केंद्रात वळवणे
  • पोयसर नदीवर पाच ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारणे व त्यांची १५ वर्षे देखभाल करणे.
  •   पोयसर  नदीची लांबी- ११.१५  किमी
  • कार्यालयीन अंदाज- ९३४ कोटी १५ लाख रुपये
  • सर्व करांसह एकूण खर्च- १४८२ कोटी ३९ लाख रुपये

पोयसर नदी कुठे आहे?

बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानातून उगम पावलेली पोयसर नदी पुढे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून पुढे मालाड खाडीत विसर्जित होते. पोयसर नदीला कमला नेहरू नाला, जोगळेकर नाला, पी. एम. जी. पी. नाला, समता नगर नाला, गौतम नगर नाला असे विविध नाले मिळतात. तसेच विविध पर्जन्य जलवाहिन्यांमधून त्या त्या परिसरातील वसाहती, झोपडपट्टय़ा व सोसायटय़ांमधील मलमिश्रित सांडपाणी नदीमध्ये प्रवाहित होते. तसेच नदीच्या काठावर असलेल्या तबेल्यांमधून शेणमिश्रित पाणी प्रक्रियविना नदीमध्ये सोडण्यात येते. 

The post पोयसर नदीसाठी १२०० कोटींचा खर्च appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3f7rPTV
via

No comments:

Post Bottom Ad

Pages