मुंबई : आरसीएफ येथील कोविड सेंटरमधील करोनाबाधित आरोपीने पलायन केल्याचा प्रकार शनिवारी घडला. या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून तो चेंबूर परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. त्याला तात्काळ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपी सोनू गुप्ता हा चेंबूर कॅम्प परिसरातील सराईत आरोपी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी धमकावणे व जबरी चोरी, खंडणीचे दोन गुन्हे दाखल होते. गुप्ताच्या सांगण्यावरून त्याच्या तीन साथीदारांनी परिसरातील २७ वर्षीय तरुणावर शनिवारी पेव्हर ब्लॉक व चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अखेर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात गुप्ताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चेंबूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पण वैद्यकीय चाचणीत त्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरसीएफ येथील व्हिडीओकॉन कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. पण तेथील खिडकीचा गज उचकटून त्याने तेथून पलायन केले. चेंबूर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेऊन पोलीस संरक्षणात त्याला तेथे ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
The post करोना उपचार केंद्रातून पलायन केलेला आरोपी ताब्यात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3f85J3W
via
No comments:
Post a Comment