मुंबई : भाजप नेते आमदार आशीष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ओसामा समशेर खान(४८) याला अटक केली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी माहिम येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९च्या पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचा ताबा वांद्रे पोलिसांना देण्यात आला आहे. आरोपीचा जमिनीच्या वाद होता. ती जमीन म्हाडाने ताब्यात घेतली होती. तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहाणीप्रकरणी खानच्या मुलाविरोधात हत्येच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल होता. त्याचा मुलगा दोन महिने त्याप्रकरणी तुरुंगात होता. त्या जमीन वादाच्या रागातून त्याने शेलार यांना दूरध्वनी करून धमकी दिली.
The post आशीष शेलार यांना धमकावणारा अटकेत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F8UzpZ
via
No comments:
Post a Comment