मुंबई: प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्यांने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत,तपास सुरू केला आहे.
माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे रहात असलेल्या चेंबूर परिसरातील निलेश नानचे या काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद होता. हंडोरे यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे प्रभारी हे पद आहे. मात्र झालेल्या वादामुळे आपल्याला येणाऱ्या पालिका निवडणुकीत हंडोरे उमेदवारी मिळवून देणार नाहीत, असा राग नानचे याच्या मनात होता. त्यामुळे त्याने संदीप गोरे या इसमाच्या मदतीने चंद्रकांत हंडोरे यांना धमकी दिली.
The post काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हंडोरे यांना धमकी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3HSEPtf
via
No comments:
Post a Comment