बनावट पावत्यांद्वारे ७० कोटींचा करपरतावा, दोन व्यावसायिकांना अटक - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

बनावट पावत्यांद्वारे ७० कोटींचा करपरतावा, दोन व्यावसायिकांना अटक

नवी मुंबई  ‘सीजीएसटी’ आयुक्तालयाची कारवाई

मुंबई : मुंबई विभागाच्या नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट अर्थात करपरताव्याचा दावा करत करचोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. बनावट पावत्यांद्वारे ७० कोटी रुपयांचे  इनपुट क्रेडिट मिळवून करचोरीचा प्रयत्न करण्यात आला असून याप्रकरणी दोन व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये १४ हून अधिक व्यावसायिक संस्थांनी कोणत्याही सेवा किंवा वस्तूंचा पुरवठा न करता  ३८५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बनावट पावत्या जारी केल्याचेही कारवाईतून उघड झाले आहे.

करचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सीजीएसटी मुंबई विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे एक विशेष पथकही तयार करण्यात आले असून या पथकाने मागील काही महिन्यात उल्लेखनीय कारवाई केली आहे. आतापर्यंत करचोरी करणाऱ्या वा करचुकवेगिरी करणाऱ्याविरोधात कारवाई करत ५०० गुन्हे दाखल केले आहेत. तर ४० जणांना अटक केली आहे. ४५५० कोटी रुपयांच्या करचोरीची प्रकरणे उघड केली आहेत. महत्त्वाचे ६०० कोटी रुपयांची करवसुली केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३ जानेवारीला ठाण्यात कारवाई करत २२ कोटींची करचोरी समोर आणली. याप्रकरणी ठाण्यातील पितापुत्रांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

 ठाण्यातील कारवाईनंतर शनिवारी सीजीएसटीच्या पथकाला मिळाल्या माहितीनुसार नवी मुंबईत कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७० कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट   मिळवून करचोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यावसायिकांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन व्यावसायिकांपैकी एक मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक आहे. तर दुसरा मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेिडगचा मालक आहे. बिटुमेन, अ‍ॅस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड इत्याडीच्या व्यापारासाठी या दोन्ही संस्था जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. या दोन्ही व्यावसायिकांनी बनावट क्रेडिट टॅक्सअंतर्गत करचोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू असून या येत्या आठवडय़ात करचोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सीजीएसटी पथकाकडून देण्यात आली आहे.

The post बनावट पावत्यांद्वारे ७० कोटींचा करपरतावा, दोन व्यावसायिकांना अटक appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GcNJ44
via

No comments:

Post Bottom Ad

Pages