मुंबई : निवडणुकांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे केंद्रातील भाजपचे नेते प्रत्यक्षात मोगलांप्रमाणे महिलांना त्रास देत आहेत, अशी तिखट टीका करत माझ्या बहिणी या सावित्रीबाई फुले व जिजामातेच्या मातीतल्या लेकी आहेत. महाराष्ट्राच्या महिल्या या घाबरणाऱ्या नाहीत तर लढणाऱ्या आहेत हे दिल्लीतील नेत्यांनी विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींवर छापे टाकण्यात आल्याच्या घटनेचा सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी राजकारणात असल्याने आमच्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप व कारवाई करणे समजू शकतो. पण सार्वजनिक जीवनात नसलेल्या महिलांना त्या केवळ आमच्या बहिणी आहेत म्हणून लक्ष्य करणे हे वाईट आहे, दडपशाहीचे राजकारण आहे. पण माझ्या बहिणी या घाबरणाऱ्या नाहीत त्या लढणाऱ्या आहेत असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
The post छाप्यांनी घाबरणार नाही -सुप्रिया सुळे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FH2ht8
via
No comments:
Post a Comment