त्वरित चाचण्या करण्याचे आवाहन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

त्वरित चाचण्या करण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असून विविध उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांच्या त्वरित चाचण्या करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

शहरात पालिकेच्या २६० चाचणी केंद्रावर मोफत चाचणी उपलब्ध आहे. तसेच पालिकेच्या २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधल्यानंतर देखील आपल्या नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळेल.  

मुंबईत मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. त्याच बरोबर मुंबईत खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये देखील या चाचण्या निर्धारीत शुल्क आकारून करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदवणे गरजेचे आहे.

विशेष काळजी आवश्यक… ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहव्याधी आहेत (फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा व्यक्तींनी आणि  प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती महिला, डायलिसिसवरील रुग्ण, कर्करूग्ण इत्यादी जोखीम गटातील नागरिकांनी योग्य ती अधिकाधिक काळजी घ्यावी, असे देखील आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

The post त्वरित चाचण्या करण्याचे आवाहन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2WXQ7dH
via

No comments:

Post Bottom Ad

Pages