मुंबई : गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना सायबर पोलिसांनी समन्स बजावला आहे. यापूर्वी या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. १४ ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यात सांगितले होते. त्याप्रकरणी कुंटे यांच्या अहवालानंतर याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात २६ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी सायबर पोलीस सध्या तपास करत आहेत. त्याप्रकरणी आता सायबर पोलिसांनी सीबीआयचे संचालक जयस्वाल यांना समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. जयस्वाल राज्याचे पोलीस महासंचालक होते. त्या वेळी फोन टॅपिंग प्रकरण, तसेच गोपनीय माहिती गहाळ झाल्याचे प्रकरण झाले होते.
त्याबाबत माहिती घेण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. नुकतीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांप्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. त्यामुळे आता दोन यंत्रणांमध्ये वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
The post सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचे समन्स appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3auq2G9
via
No comments:
Post a Comment