मुंबईत म्हाडाकडून लवकरच वसतिगृह - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

मुंबईत म्हाडाकडून लवकरच वसतिगृह

मुंबई :  शिक्षण आणि रोजगाराच्यानिमित्ताने राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातुन मुंबईत येणाऱ्या तरूण/तरुणींसाठी, विद्यार्थ्यांसाठी आता लवकरच मुंबईत वसतिगृह उभारण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून बांधणी करण्यात येणाऱ्या या वसतिगृहाचे २६ जानेवारीला भूमिपूजन होणार आहे. जिजामाता नगर, काळाचौकी येथील १५०० चौ मीटर जागेवर वसतिगृहाची १८ मजली इमारत बांधण्यात येणार असून यात ५०० विद्यार्थ्यांची/तरुणतरुणींची राहण्याची सोय असणार आहे.

शिक्षणासाठी आणि नोकरीधंद्यासाठी राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या तरुणतरूणींना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत मुंबई मंडळाने आता मुंबईत वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत चार ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिले वसतिगृह काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे बांधण्यात येणार आहे. जिजामाता नगर येथील झोपडपट्टीलगत म्हाडाच्या मालकीचा १५०० चौ मीटरचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर ५०० विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होईल असे वसतिगृह बांधण्यासाठी मुंबई मंडळाकडून सविस्तर आराखडा तयार करत त्यास मंजुरी घेण्यात आली आहे. या मंजुरीनंतर बांधकामासाठी निविदा काढत सी बी अँड सन्स या कंपनीची नियुक्ती करत त्यांना कार्यादेश देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  वसतिगृहाची इमारत १८ मजल्यांची असेल आणि यात खाणावळीसह आवश्यक त्या सर्व सुविधा असतील असेही त्यांनी सांगितले. या वसतिगृहाचे काम सुरू करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने आता भूमिपूजनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २६ जानेवारीला वसतिगृहाचे भूमिपूजन करत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे शनिवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे.

The post मुंबईत म्हाडाकडून लवकरच वसतिगृह appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3n7s1ae
via

No comments:

Post Bottom Ad

Pages