सागरी किनारा मार्गाच्या खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 7, 2022

सागरी किनारा मार्गाच्या खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी

मच्छीमारांना अहवाल सादर करण्याची पालिकेची सूचना

मुंबई : सागरी किनारा मार्गासाठी वरळी येथील समुद्रात बांधण्यात येणाऱ्या खांबांमध्ये ६० मीटरचे अंतर ठेवण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीने सकारात्मक अहवाल दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; मात्र मच्छीमारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तज्ज्ञांतर्फे सर्वेक्षण केले जावे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. एखाद्या संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना सांगितले आहे. वरळी येथील समुद्रात सागरी किनारा मार्गाचे काम सुरू असून मार्गाच्या २ खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे. येथील पाणी स्थिर नाही. त्यामुळे बोटी डगमगतात. परिणामी कमी अंतरामुळे मच्छीमारांच्या बोटींना ये जा करण्यात अडथळा येणार आहे. त्यामुळे हे अंतर २०० मीटर असावे अशी मागणी मच्छीमार अनेक दिवसांपासून करत आहेत. यासाठी मच्छीमारांनी अनेकदा आंदोलने करून किनारा मार्गाचे काम बंद पाडले आहे.

गुरुवारी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत पालिका अधिकारी आणि मच्छीमार यांची ऑनलाइन बैठक घेतली. ज्या सर्वेक्षणाच्या आधारे ६० मीटरचे अंतर ठेवण्यात आले आहे त्यात मच्छिमारांच्या प्रतिनिधींचा सहभाग नव्हता. मच्छीमार स्वत: प्रत्यक्ष समुद्रात उतरून काम करतात. त्यांच्यातील काहीजण तज्ज्ञ आहेत. या तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून अहवाल तयार करून घ्यावा, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. वैयक्तिक तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालावर आमचा विश्वास नसून तज्ज्ञ संस्थेकडून सर्वेक्षण करून घ्यावे, असे पालिकेने मच्छीमारांना सांगितले; मात्र सरकारी संस्थांच्या सर्वेक्षणावर विश्वास नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. सरकारी संस्था सर्वेक्षण करणार असतील तर किमान मच्छीमारांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींना त्यात सहभागी करून घ्यावे, असे मत ‘अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’चे देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केले. किनारा मार्गाच्या १ ते ५ खांबांचे काम करण्यास मच्छीमारांचा आक्षेप नसून खांब ७ ते १०चे काम अहवाल आल्यानंतर केले जाईल, असे पालिकेचे मुख्य अभियंता विजय निगोट यांनी सांगितले. या विषयावर मत मांडण्याची संधी मिळाली नसल्याचे तांडेल यांचे म्हणणे आहे.

The post सागरी किनारा मार्गाच्या खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/32SbXm3
via

No comments:

Post Bottom Ad

Pages