कला दालनात गणेशाच्या नाना लीला.. - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 7, 2022

कला दालनात गणेशाच्या नाना लीला..

५० हून अधिक मूर्तीकारांनी घडवलेल्या गणेशमूर्ती मुंबईत

मुंबई : हाती कला असूनही कलाक्षेत्रातील प्रस्थापित वलयापासून दूर राहिलेल्या गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना जगासमोर आणण्यासाठी ‘श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना’ या संस्थेने राज्यातील ६० मूर्तिकारांच्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन मुंबईत आयोजित केले आहे. विविध संकल्पना घेऊन मूर्तीकारांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केली आहे. कलाक्षेत्रात मूर्तिकलेला महत्व असले तरी गणेशमूर्ती घडवणारे मूर्तिकार मात्र कायमच मागे राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही तरुण मूर्तिकार गणेशमूर्ती घडवणाऱ्या कलाकारांना मुख्य प्रवाहात प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ‘गणांक’ हे गणेश मूर्ती प्रदर्शन मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’त आयोजित करण्यात आले आहे.

‘गणेश मूर्ती घडवणे हे देखील इतर कलांइतकेच कसबीचे काम आहे. विविध संकल्पना घेऊन मूर्तिकार मूर्ती घडवत असतो. परंतु मधल्या काळात आपल्याकडे मूर्तिकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. तोच बदलण्यासाठी आम्ही कला दालनाची निवड केली. ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ने एका पारंपरिक कलेसाठी दालन उपलब्ध करून दिले ही बाब महत्वाची आहे,’ अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष मूर्तिकार प्रशांत देसाई यांनी दिली. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्हयांचे मूर्तिकार सहभागी झाले आहेत. अनेक संकल्पना, विचार यातून साकारलेल्या मूर्तीमधून गणेशाच्या नाना लीला पाहायला मिळत आहेत. केवळ प्रदर्शनच नाही तर ८ जानेवारी रोजी विशाल शिंदे, आतिश पालवणकर, विजय माटवकर या दिग्गज मूर्तिकरांकडून प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. काही गणेश मंडळे, मूर्तिकार, पर्यावरणप्रेमी आणि पालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ‘माती आणि पीओपी’ या विषयावर रविवारी परिसंवाद होणार आहे. प्रदर्शन ९ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वासाठी खुले आहे.

The post कला दालनात गणेशाच्या नाना लीला.. appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3G8fhI3
via

No comments:

Post Bottom Ad

Pages