शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : राज्यात करोना लशीची पहिली मात्रा १८ वर्षांवरील सुमारे ६१ टक्के नागरिकांनी घेतली असली तरी दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण सुमारे २५ टक्के इतकेच आहे. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना करोना संक्रमण वाढू नये आणि विषाणू उत्परिवर्तित होऊ नये म्हणून दोन्ही मात्रा दिलेल्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यात १८ वर्षांवरील सुमारे ९ कोटी १४ लाख नागरिक आहेत. यापैकी ५ कोटी ६१ लाख नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांची संख्या २ कोटी ३२ लाख आहे. दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण तुलनेत कमी आहे.
राज्यात सर्वाधिक पहिल्या मात्रेचे सुमारे ८९ टक्के तर दुसऱ्या मात्रेचे सुमारे ४४ टक्के लसीकरण मुंबईत झाले आहे. मुंबईत दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण जवळपास ४५ टक्के आहे. त्या खालोखाल भंडारा आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे.
पहिली मात्रा ७० टक्कय़ांहून अधिक पूर्ण केलेले जिल्हे पुण्यापाठोपाठ सिंधुदुर्गमध्ये पहिल्या मात्रेचे ७८ टक्के तर दुसऱ्या मात्रेचे ३९ टक्के लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल सातारा, सांगली, गोंदिया आणि कोल्हापूरमध्ये पहिल्या मात्रेचे लसीकरण ७० टक्कय़ांहून अधिक झाले आहे. परंतु दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ३० टक्के आहे.
२१ जिल्ह्यांमध्ये पहिल्या मात्रेचे प्रमाण सुमारे ४० ते ५० टक्के आहे. परंतु दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण हे १८ टक्कय़ांखालीच आहे. यात दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण हिंगोली, नांदेड येथे सुमारे १४ टक्के आहे. तर त्या खालोखाल जळगाव, सोलापूर, गडचिरोली, औरंगाबाद आणि यवतमाळमध्ये सुमारे १६ टक्के आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक रुग्णसंख्या ठाण्यात असूनही ठाण्यात मात्र दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण २७ टक्केच आहे.
गणेशोत्सवानंतर संसर्गवाढीची शक्यता वर्तविली जात होती. परंतु तसे फारसे झालेले नाही. पुढील काही काळ अशीच रुग्णसंख्या स्थिर राहिली तर आपण ‘एण्डेमिक’कडे जात आहोत असे म्हणता येईल. विषाणू उत्पर्वितित होऊ नये यासाठी दोन्ही मात्रांचे लसीकरण वेगाने व्हावे, असे मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.
राज्यात सध्या शाळांसह मंदिरे, सिनेमागृहे टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. पहिली मात्रा ही करोनापासून संरक्षणासाठी पुरेशी नाही. तेव्हा संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी पुढील एक ते दोन महिन्यांत लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण करण्याची मोहीम वेगाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. राहुल पंडित, करोना कृती दलाचे सदस्य.
लसीकरणात अग्रेसर जिल्हे
जिल्हा पहिली मात्रा दुसरी मात्रा
मुंबई ८९.३८ ४४.५५
भंडारा ८४.५५ ३१.६८
पुणे ८४.५४ ३९.०९
सिंधुदुग ७८.४३ ३९.०५
सातारा ७७.२४ ३०.७८
सांगली ७६.२५ २९.०४
गोंदिया ७४.५५ २९.२२
कोल्हापूर ७३.८४ ३०.३७
नागपूर ६८.८७ २८.२९
चंद्रपूर ६७.९५ २०.५९
वर्धा ६७ २४.९१
रायगड़ ६६.१६ २६.२७
रत्नागिरी ६४.६९ २८.१३
ठाणे ५९.५५ २७.४४
The post राज्यात २५ टक्के लोकांना दुसरी मात्रा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3a3qLxW
via
No comments:
Post a Comment